STORYMIRROR

PANKAJKUMAR THOMBARE

Romance

4  

PANKAJKUMAR THOMBARE

Romance

गझल कधी कधी

गझल कधी कधी

1 min
384

ये ना मिठीत माझ्या राणी कधी कधी 

प्रेमात धुंद गाऊ गाणी कधी कधी 


फेकून दुःख सारे हासून घे जरा

 आणू नकोस डोळा पाणी कधी कधी 


समजून घे इशारे बोलायला नको

 प्रेमात बंद होते वाणी कधी कधी 


आता नको दुरावा प्रेमात साजणी

लावू नकोस आणीबाणी कधी कधी


आता नको बहाणे भेटावया सखे

माझी तुझी फुले प्रेमकहाणी कधी कधी


पाऊस गार वारा झेलून घे जरा

रानात नाच मोरावाणी कधी कधी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance