गझल - गुरू
गझल - गुरू


अनलज्वाला : २४ मात्रा [८+८+८]
शिक्षीत करी ज्ञान देवुनी थोर ते गुरू
अंधकार ते दूर सारुनी थोर ते गुरू
प्रेमळ नाते असे गुरूचे ते ममतेचे
मवाळ भाषा गोड बोलुनी थोर ते गुरू
शिकवी शिष्या भले चांगले रिवाज देती
सवयी लावी नित्य सांगुनी थोर ते गुरू
कलाकार ते शिक्षक असती मुले घडवती
माथा झुकतो तया वंदुनी थोर ते गुरू
आदर्श गुरू मला भेटले सार्थक जिवनी
धन्य जाहले आज भेटुनी थोर ते गुरू