गीत गाता..
गीत गाता..
दुःख सहन झालं ना पाहता
गळ्याला लागून रडली जाता जाता....
माझ्या पासून ती दुर झाली
वेळेच्या खेळात मजबूर झाली
शब्द सापडले ना प्रेमाच गीत गाता.....
तिन मनात कीती दुःख लपवल
दुर कूठे आज प्रेमाच सुख हरवल
नजरेन समजावल सार नजर उचलता.....
शेवटच आली ती मला भेटायला
शब्द बोलता दुःख लागले दाटायला
मन जिंकल माझ तिन प्रेमात हरता.....
ती स्वप्नं बनून राहिली माझ्या स्वप्नांत
संगमन शेवटच प्रेम पाहिल नयनात
आज सगळ संपल.. काही सुरू होत......
