STORYMIRROR

Somesh Kulkarni

Tragedy Others

4  

Somesh Kulkarni

Tragedy Others

घटस्फोट

घटस्फोट

1 min
435

जुळून येतात योगानुरुप ऋणानुबंधाच्या गाठी

वचनं दिली जातात एकमेकांना आयुष्यभरासाठी


प्रत्येकाची असतात वेगवेगळी मतं

विश्वासावरच टिकतं कुठलंही नातं


असले मतभेद तरी मनभेद नसावा

आयुष्याचा आरसा कायम स्वच्छ असावा


शोधायचा असतो क्षणाक्षणाला आनंद

जसा भ्रमर शोधत येतो फुलातला मकरंद


घ्यावा कधी कमीपणा नातं टिकावं म्हणून

मिळत नाही सुख खोटं हास्य चेहऱ्यावर आणून


तुलनेनं सुधारत नाही जोडीदाराचा स्वभाव

साथ द्यावी भक्कम, नको समजूतदारपणाचा अभाव


हस्तक्षेपाने इतरांच्या जातो नात्याला तडा

घटस्फोटाने उलगडत नाही संसारातला तिढा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy