STORYMIRROR

SK JI

Inspirational Others

3  

SK JI

Inspirational Others

घरात काय करायचं

घरात काय करायचं

1 min
997


आता घरातच राहायचं,

आणि काय करायचं

उडला गोंधळ मनाचा,

आता काय करायचं


घरातच राहू आता,

आणखी काही दिवस

राहा, शांत असल्या ठिकाणी,

नका करू वसवस


प्रश्न पडला मनाला,

घरात काय करायचं

मस्त खायचं, प्यायचं,

छान, बसायचं, झोपायचं


आणखी काय करू शकतो,

आपण, या काळात

अडगळीच्या खोलीत जाऊन,

डोकवा एकदा भूतकाळात


राहून गेलं होतं धावपळीत,

स्वतःकडे बघण्याचंच

आपले सुटले होते मागेच,

पोटासाठी पळण्यातच


आज जरा थांबलोच तर,

बघुया ना स्वतःकडे

आपल्याकडे,

आपल्यांच्याकडे


पूर्ण करूया जे राहिले,

होते वाचवायचे अर्धे

बदलू या दृष्टिकोन,

बदलू या डोळ्यावरचे पर्दे


बोलू या मनातले,

आपल्या लोकांशी

करून मन शांत,

साधू संवाद स्वतःशी


आत्मचिंतन करूया,

या वेळेत मिळालेल्या

आवर मनाला घालुया,

गुलामीच्या बेड्या करून ढिल्या


मी, तर थांबणार,

आणि बघणार

शांत राहणार,

संयमही ठेवणार


शांत राहणं, बरं असतं,

जेव्हा हातात काहीच नसतं

वेट एन्डच्या भूमिकेत,

आपल्या सर्वांचेच भलं असतं

वेट एन्डच्या भूमिकेत,

आपल्या सर्वांचेच भल असतं


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational