घर माझे
घर माझे
पाऊस आला पुर आला
असा कसा डोगंर फुटला
मातीच्या ढिगाऱ्यात
संसार माझा वाहून गेला
छोटस होत घर माझ
कुठे दिसत नव्हते
होत्याचे नव्हते
डोळ्यादेखत पाहात होते
मी ओरडत होते
रडतं होते
हंबरडा फोडून
कुठे शोधु घरं माझं
काहीच कळत नव्हते
भुईसपाट झालं गाव माझं
ओसाड झाल सारं काही
घर होते की नव्हते
दिसत नव्हते काही
जरा निरखून पाहीले
दूरवरून तर घर नाही
पण आंगण मात्र दिसत होते
घारा बाहेर शाबूत
राहिलेले पायतान
ईथेच घर असल्याच
सबुत देत होते