STORYMIRROR

Sanjay Dhangawhal

Abstract

4  

Sanjay Dhangawhal

Abstract

घाव

घाव

1 min
335

न बोलताही

घाव देतात शब्द

हळव्या मनाला जखम देतात शब्द


सोसून किती सोसावे

घेऊन वेदना

अश्रूंनाही रडवतात

किती शब्द


व्यथा सांगावी कुणाला

कळेना काही 

जीवाला किती

जाळतात शब्द


नसे अक्षय इथे

निःशब्द सारेच काही

खऱ्या प्रेमास अबोल

करतात शब्द


राख भावनांची

करावी का कोणी

अंतरात डाग देतात शब्द


तिरस्कार हा 

काळजास भिडतो

काळजास अंगार 

लावतात शब्द


समजून कोणीच

घेईना कसे

दोन हृदयाचा डाव मोडतात शब्द


भल्याची कदर 

करे ना कोणीच

उगाच छळ मांडतात शब्द


स्वभाव सरळ 

वार पाठीवर होत

घात विश्वासाचा

करतात शब्द


नैराश्यतरी किती 

घ्यावे माणसाने

खऱ्यास नकार देतात शब्द


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract