STORYMIRROR

Pradnya Ghodke

Fantasy

3  

Pradnya Ghodke

Fantasy

गडे गुज..तुझे..ते..!

गडे गुज..तुझे..ते..!

1 min
179

गडे, गुज, तुझे..ते,

कसे! अंतरिक जीवाला..

लोभ खास लागे,

रोज नव्यात मनाला... १.


वेलशी तू नाजूक,

का..! भारतेस नखरा..

किती झोक विव्हलांत,

अन नजाकित दरारा... २.


बघू! बाक कमनिय,

सरकता बांधा निसटता..

मधू पाठ पन्हाळीत,

नजर बाण असा गुंतता...! ३.


सखे, तू वितळूनी,

अन निथळूनी पुन्हा..

जे सांगते मला मग,

बघ, होईल थोडा गुन्हा...! ४.


कळीचे, फुलांचे गडे,

कळतेच तसे मला..

गंधार वेड्या धुंदीत,

हा आसमंत भारलेला...! ५.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy