गड किल्ले
गड किल्ले
नाव मोठे लक्षण खोटे
गड किल्ले दिसेनात कूठे....
इतिहासाची ती देणगी
उजाडून पेटविली ठिणगी
गड किल्ल्याचे झालेत तोटे...
सोन्या सारखे ते किल्ले
ठेवा म्हणुन तुम्हा त्यांनी दिले
जतन करा तुम्ही होतील गारगोटे....
गड किल्ले आपुली शान
महाराष्ट्राची ती आहेत शान
सांभाळा का तुम्हा लाज वाटे....
किल्ल्यांची पहा जा अवस्था
सरकार करेना त्यांची व्यवस्था
भेगा पडल्यात फूटतील फाटे.....
