STORYMIRROR

Meera Mahendrakar

Abstract

3  

Meera Mahendrakar

Abstract

गाव आमचे

गाव आमचे

1 min
160

 शाळेच्या उन्हाळाच्या सुट्ट्या लागल्या की गावी जायचे ठरले असायचे

सुट्ट्यांचे धम्माल करण्याचे ते गावातले दिवस कधी न विसरता यायचे


गावातली बहुतांश घरे कौलारू असायची 

पंख्याशिवाय शेणाच्या सारवणीने थंड रहायची


गावातले सगळेच रस्ते दगड व मातींचे असते

घराबाहेर बांधलेल्या गाई म्हशिनीच अर्धे व्यापले असते


जेवण बनविण्यासाठी घरामधे कायम चूल असायची

इंधन म्हणून चुलीसाठी रानातली लाकड वापरायची


गावी आमच्या आजोबांची सुंदर शेती आहे

फळझाडांची आखीव एक माळरांग आहे


पायी फिरत फिरत वावरात जायचो

रस्तावरची बोरं चिंच तोडून खायचो


वावरात आमच्या भली मोठी विहीर होती

गोड थंड पाण्याची चव तिच्यखेरीज कश्यात नव्हती 


उन्हाळ्यात दिवसाचा उन्हाचा मारा शेतात जाणवत नव्हता

गर्द वृक्षाच्या सावलीत बसुन मजेत दिवस जात जायचा


गावात आमच्या एक छोटी नदी वाहते

मोहक वळणदार गावाची सुंदरता वाढवते


 नदिशेजारीच एक प्राचीन शिवाचे मंदिर आहे

मोठ्या काळ्या दगडाचे हे पुरातन बांधकाम आहे


गावरान गोष्टींची मज्जा फक्त गावात गेल्यावरच येते

जुन्या गोष्टीचे महत्व सगळे नविन भेटल्यावर कळते 


अशिक्षित पण प्रेमळ लोकांचा गाव आमचा

आजही आठवणीच्या कप्यात आहे साठला


இந்த உள்ளடக்கத்தை மதிப்பிடவும்
உள்நுழை

Similar marathi poem from Abstract