STORYMIRROR

Arvind Bhamre

Abstract

3  

Arvind Bhamre

Abstract

! गांधी तुझ्या देशात....

! गांधी तुझ्या देशात....

1 min
15K


गांधी,

तुझ्या देशात

तुझा फोटो असलेल्या कार्यालयात

खुल्लमखुल्ला भ्रष्टाचार सुरू आहे,

तुझे नाव दिलेल्या चौकात

दंगलीत ,

तलवारीचे सपासप वार होतायत

तुझ्या पुतळ्या समोर भरणा-या बाजारात

शांतीचा संदेश देणारी तुझी तत्वे

तुझ्या देखत तुडवली जात आहेत!

गांधी,

तुझ्या देशात

तुला विस्मरून

नव्हे;

तुला स्मरून

बलात्कार,अत्याचार होतोय

आसुरी वृत्तीचा सर्वोदय आज

जिकडे तिकडे फोफावतोय.

तुझ्या सत्यासाठी नव्हे;

सत्तेसाठी

मोर्चे, उपोषणे

घातपात घडवला जात आहे.

आश्वासन देणारेच

मागणा-यांचे  हात

छाटून सहानुभूतीसाठी

पापण्या ओलावत आहेत!

गांधी,

तुझ्या स्वतंत्र देशात

स्वातंत्रा साठी तळमळारे

हजारो उपेक्षित मने

आतल्याआत घुसमसतायत,

चाकोरीबद्ध व्यवस्थेत

उपाशी जन्माच्या उदरभरणासाठी

मुठभर नेत्यापुढे गुडघे टेकून

स्वताला कोंडून

जगण्याच्या उमेदीला रोज संपवतायत!

गांधी,

तुझ्या अहिंसेचा जयजयकार नव्हे;

अराजकता माजवणारे विघातकांचे हात

रक्ताने सळे शिंपत आहेत

मानवतेला उध्वस्त करून,

आपल्याच भाऊबंदकीचे मुंडके

ठेचत आहेत आंधळे नि बहिरे होउन!

गांधी,

म्हणून आता तरी बंडाचा विद्रोह

माझ्या हातून घडू दे

रामाचे शस्त्र या युगात तरी उचलू दे!

पण

मी पाहतोय;

तू या एकविसाव्या शतकातल्या

रक्ताने माखलेल्या सूर्याला ही

शांतीचा संदेश देतोय;

नेमस्त डोळे मिटलेला पुतळा होउन!

 

         


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract