STORYMIRROR

Arvind Bhamre

Comedy

2  

Arvind Bhamre

Comedy

विश्वास ठेव अंतरी

विश्वास ठेव अंतरी

1 min
2.6K


जन्म जरी चिखलात

स्वर्ग तुझ्या हातून

पंख मोकळे करून

श्वास घे नभा स्पशून!

चोहीकडे काटे फुलाच्या

खुशाल हसते उन्हात

काठावर नाही रे मजा

झेप घे वादळी पूरता!

 वाटेवर चालतांना

विसावा सावलीचा घे

मिटल्या डोळ्यात

स्वप्न उन्हाचे बांधून घे!

ओझे आहे अवघड

वाकेल पाठीचा कणा

सूर्य आगीत जळून ही

उजाडतो पुन्हा पुन्हा!

स्मशान रातीच्या धुरानं

डोळ्यात येईल पाणी

इतिहास गुंजला आहे

खडकावर पेरून गाणी! 

तुझ्या हदयातील स्पंदनं

पेटवतील उद्याचे रान

 डोंगर मातीवर ही

 उगवते  हिरवे पान!

राबणाऱ्या हातांना

जोडू नको मंदीरी

देवाला तू निर्मिले

विश्वास ठेव अंतरी!

 

 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy