एकटी
एकटी
एकटी पाहुनी रुसे, सारखा पुसे,
मला एकांत कधी येशील तू परतूनी
सख्या साजणा पुन्हा घरट्यात
पापण्यात लपवून मला
कधी घेतला हात हातात
आजवरी जपूनी ठेवले
गुपित बोलले, मज तू कानात
तू भाषा या अधरीची
मूक प्रीतीची ज्योत हृदयात
कधी येशील तू परतूनी
सख्या साजणा पुन्हा घरट्यात
तू गेला अर्ध्यातूनी
उगा राहूनी, भास छळतात
अजुनी त्या वाटेकडे
नजर ही भिडे, पाय वळतात
आता तू ना दिसशी जरी
पुन्हा अंतरी तूच श्वासात
कधी येशील तू परतूनी
सख्या साजणा पुन्हा घरट्यात
मन पाखरु होऊन उडे
पुन्हा तुजकडे, तुझ्याच जगात
मी व्याकूळ होते अशी
विसरते कशी, कधी दिनरात
गीतात तुझ्या हरवुनी
येई दाटूनी प्राण कंठात
कधी येशील तू परतुनी
सख्या साजणा पुन्हा घरट्यात
