एकतेचे बळ
एकतेचे बळ
चला उठा सारे, जाऊ चला पुढे
नव्या धोरणाचे उभारुया प्रकल्प
नव्या युगाच्या या उंबरठ्यावर
आपण सारे मिळुनी करुया संकल्प
ध्येय सारे एकवटुनी पुढे जायचे
नव्या उमेदीने कार्य करायचे
एकतेचे बळ हे किती असे मोठे
जगाला ते करून दाखवायचे
संकटांना मुळीच नाही घाबरायचे
त्वेषाने सर्व संकटांना दूर लोटायचे
निर्धार मनाचा पक्का करुनी घ्यायचे
नव्या युगाच्या उंबरठ्यावर जायचे
भित्याच्या पाठी राक्षस म्हण आहे ही
ते ध्यानी ठेऊनी सदैव दक्ष राहायचे
सुखी जीवनाच्या आनंदासाठी सर्वांनी
संकटावर मात करुनी निर्धाराने जायचे
माणुसकीचे जतन करुनी उत्कर्ष करुया
साऱ्या दुनियेत देशाला प्रगतीपथावर नेऊया
एकजुटीचा दावा खराच आहे वैभवशाली
सत्यता पटवायला आपण सारे एक होऊया
