एकदा भेटून जा
एकदा भेटून जा
स्वप्नात एकदा तू भेटून जा सखी
बोलायचे तुला जे बोलून जा सखी
माझ्या मनात आहे दु:खांत वेदना
दु:खात आज माझ्या रंगून जा सखी
ठेवू नकोस काही ओठात बोलणे
ओठातल्या स्वरांना खोलून जा सखी
माझीच बाग आहे रंगीत ही फुले
भावे तुला फुले ती माळून जा सखी
धोका कसा कळेना साकी मला दिला
डोळ्यात प्रेम माझे पाहून जा सखी
डांबून वेदनांना ओठातल्या जगी
प्रेमात भावनांना वाटून जा सखी
काळोख दाटलेला डोळ्यात आसवे
जागू नको उगा तू झोपून जा सखी