एकांत भासतो मज
एकांत भासतो मज
मज भासतो एकांत
नसतांना तू जवळ
तुझ्या आठवणीतच
मन कावळ बावळ..!
मला वाटतो दुरावा
येऊ जवळ आपण
दोन बोल प्रेमातील
तुला मिळेल तेपण..!
क्षण प्रेमाचा करतो
तुला भेटण्यासाठी
मन आतुरले माझे
तुला बघण्यासाठी..!
तुझ्या प्रेमामध्ये मला
होते वेगळेच भास
जेव्हा जाणवते मला
तुझ्या प्रेमाची आस..!