एका फुलावर कविता
एका फुलावर कविता
गुलाब अरे गुलाबाच्या मोहक फुल आहेत कितीतरी रंगरुप तुला.
गुलाबी, पांढरा, नारंगी, पिवळा विविध छटा शोभतात तुुला
पांढरा असे ओळखीचे प्रतीक तर,पिवळा स्नेहाचे करतो भाकीत
प्रेमाचे प्रतीक ओळखतात लाल गुलाबला प्रेम देऊन व्यक्त करतात तुला
तुझ्या अंगाला आहे कितीतरी काटेमात्र उगीचच काही फोडतात फाटे
तुझ्या सुगंधाने होतात मोहीत जुळते ह्यातून नवी प्रीत
म्हणूनच, कधी म्हणू नये दिवस आपले खराब ठणकून सांगावे दुसऱ्याला काट्यांनी वेढलेला मी पण एक गुलाब

