एक ती.. सरणावर..!!
एक ती.. सरणावर..!!
एक ती.. सरणावर!!
एकटी... सरणावर!!
कोणी आक्रंदताना,
कोणी चित्कारताना,
जोडायचे त्यांस कर!!
ते आप्त
ते शेजारी
ते मित्रगण
याचा तो
त्याची ती
लेकुरवाळी ती
आपलीही कोणी दूरवर!!
एक ती.. सरणावर!!
एकटी... सरणावर!!
एक श्वास फुकट नाकात जाणारा
एक ध्यास शरीर जाळत जाणारा
एवढेच आपले.. फारतर!!
घड्याळाची टिकटिक
कानात आवाज स्पष्ट
मध्येच क्षणात अस्पष्ट..
किल्ली दिली का आज?
आज तरी आहे दिलेली..
तेवढीच सत्ता "आज"वर!!
थोडेसे गलबलून
घुंगट बाजूला सारून
थोडेसे पाहिले लांबून
ती मी नाही.. अजूनतरी..
रणशिंग फुंकलेले दूरवर!!
एक ती.. सरणावर!!
एकटी... सरणावर!!
