STORYMIRROR

Avanee Gokhale-Tekale

Others

3  

Avanee Gokhale-Tekale

Others

तू कधीतरी ये अशी..!!

तू कधीतरी ये अशी..!!

1 min
3

तू कधीतरी ये अशी.. 

तळहातावरची रेष बनून.. टाईम प्लीज म्हणणाऱ्या मुठीवरचे शेष बनून.. तू कधीतरी ये अशी..

भरतकामा मधली एकसंध साखळी बनून.. ते करताना उमटणाऱ्या गालावरची खळी बनून.. तू कधीतरी ये अशी.. 

सारीपाट मांडताना फोडलेला चिंचुका बनून.. तो खेळताना झालेल्या गोड चुका बनून.. तू कधीतरी ये अशी.. 

अवकाळी पावसा नंतरचा गारवा बनून.. त्या गारव्यात बहरलेला मारवा बनून.. तू कधीतरी ये अशी.. 

पालवी फुटलेला चैत्र बनून.. त्या चैत्रातले मैत्र बनून.. तू कधीतरी ये अशी.. 

कुठवर शोधू तुला.. तू तर क्षितिजापार गेलीस सखे.. 

बयो कविते.. तू कधीतरी ये अशी..

त्या मोरपंखी दिवसांची आठवण बनून.. त्या लिहिलेल्या ओळींची साठवण बनून..

एकदा.. फक्त एकदा.. भेटायला येशील परत? 

तू कधीतरी ये अशी..!!


Rate this content
Log in