STORYMIRROR

Gouri Santosh

Abstract

3  

Gouri Santosh

Abstract

एक पाऊस असाही..!

एक पाऊस असाही..!

1 min
231

एक पाऊस असाही...! 


काळ्याकुट्ट मेघांची गर्जना, 

विजेचा नाचरा लपंडाव, 

किनार्‍याची आसावललेली तृष्णा, 

मोठाल्या सरींची बेफाम धाव..! 


       धास्तावून सारे उभे किनारी, 

     जीव काळजात गोळा करूनी, 

  जीवनदायिनी आज का जीवघेणी, 

डोळ्यात पाणी, सर्व देव आठवुनी..! 


    शेतकरी ,शाळकरी ,बाया बापुडे, 

    उभे सारे हेलावून चिता गती, 

    काय वाढून ठेवले,हाय दैवा, 

   असे आज नीयतीच्या चित्ती...! 


अचानक वाहे एक क्रूर लोंढा, 

रुद्र भयाण आवेग तयाचा, 

भूकही ही मोठी अनाम त्याची, 

पोटी घेई सारे, हाती जे जे त्याच्या...! 


   सार्‍यांची एकच आर्त किंकाळी,

  जीव सारे कोरडे शांत शांत, 

  पळापळाचा मेळ साधुनि, 

 निसर्गही वाहे भयाण निवांत. ..!!!  


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract