एक दिवा
एक दिवा


एक दिवा त्यांच्यासाठी
ज्यांनी उभारली
स्वराज्याची गुढी
प्रथम नमितो आम्ही त्यांच्या चरणी
आई जिजाऊ अन् राजं शिवछत्रपती
एक दिवा त्यांच्यासाठी
जन्म दिला आम्हा ज्यांनी
आभार मानतो त्यांचे आम्ही
मस्तक हे तुमच्या चरणावरी
एक दिवा त्यांच्यासाठी
ज्यांनी काया झिजवली देशासाठी
ते वीर क्रांतिकारी
विसरुन चालणार नाही त्यांच्या स्मृती
एक दिवा त्यांच्यासाठी
सर्व सामान्य रयतेसाठी
शिक्ष
ण गंगा आणिली ज्या भागीरथांनी
विनम्र अभिवादन त्यांच्या चरणी
एक दिवा त्या देशासाठी
जिथे जन्मलो आम्ही.
नमितो त्या संस्कृतीला
जी शिकवते खरे पणाचा रास्ता
एक दिवा त्यांच्यासाठी
ज्यांच्यामुळे आम्ही रहातो बिनघोरी
सैन्यदल, पोलीस दल
यांना देतो आम्ही मनाची सलामी
दिप लावू तो माणुसकीचा
शेतकरी साऱ्या जगाचा पोशिंदा
चालवू वारसा शिवशंभू विचारांचा
शेतकरी वर्गा मिळवून देवू सन्मान
सर्व देवांना हिच प्रार्थना