STORYMIRROR

ऋचा निलिमा

Abstract

4  

ऋचा निलिमा

Abstract

एक दिवा पेटवताना

एक दिवा पेटवताना

1 min
247

आज खूप अवघड जातंय एक एक क्षण घालवताना

हात खूप थरथरत आहेत एक दिवा पेटवताना


ढगांचा गडगडाट रस्त्यावर पाणी मनात भरते धडकी पाण्याचा थेंब झेलताना

वाराही झाला आता सुसाट अडलाय समोर एक दिवा पेटवताना


पुढे काय होणार हेच मनात विचार मनात आता सलतोय हा मौसम मस्ताना

तेलाचेही आता पाणी झाले एक दिवा पेटवताना


हातात माचीसची पेटी आणि समोर रोखलेल्या प्रारब्धाचा नजराणा

हिरमुसला जीव आता झाला कासावीस एक दिवा पेटवताना


हौसमौज सारी थोडक्यात मिटू पाहतेय

पावसाची अलवार सर बेफिकीर होऊन बरसतेय

नाद तिचा थरारक आणि धास्ती मनाला

गुंफलेला वारा रूंजी घालतो एक दिवा पेटवताना


कोण कुठे आहे तर कोण कुठे भरलेल्या ढगांचा होतोय वारंवार नाद

वारा झाला आता शांत तरी पुढची वाट दिसेना

आता पाण्याचीही झाली अडचण एक दिवा पेटवताना


किर्र शांतता सभोवताली रातकिडंही अबोल झाली

केविलवाणी रात सारी झाली हळवी सलताना

काळरात्रही धास्तावली आज एक दिवा पेटवताना


हे संकट म्हणू दैवाचा रचलेला कट

मनही आता जास्त हळहळत आहे तेही फुकट

पुढे काय होणार याचा अंदाजच येईना

चाचरतंय आज मन एक दिवा पेटवताना


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract