रूसून....
रूसून....

1 min

440
आजही नेहमीप्रमाणे सूर्य डोकावला माझ्या खिडकीतून....
बोलला, काय चाललंय? आता शब्द नाही सुचत का आतून....?
आता त्याला सांगू तरी काय?
त्या शब्दांची आणि मनाची गट्टी फू झाली आहे
त्यांना माझा आणि मला त्यांचा थोडा कंटाळा आला
म्हणून जरा ब्रेक घेतला आहे
तू सांग तुझं काम कसं चालू आहे?
सूर्य हळूच म्हणाला, "माझंही सध्या तेच चालू आहे पण जरा वेगळं...!"
माणसाची रेलचेल थांबली तसा स्वतःतच गुरफटत आहे.
म्हटलं तू एकटी बोलते माझ्याशी
करू मन थोडं हलकं तुझ्याकडे येऊन...
नेमकी तूच बसली आहेस तुझ्याच शब्दांशी रूसून......!!