रुक्मिणी
रुक्मिणी
समजून घे ना रूक्मिणी
माझ्या ह्या मनाला....!
मान्य आहे जोडले नाव राधेशी
पण माझे सारे सर्वस्व दिले तुला..!
प्रतारणा तर केली नाही ना तुझ्याशी
असे वाटू लागले मजला...!
राधेवर जरी प्रेम असले
परि जीव गुंतला आता तुझ्यात....!
तू बोलत नसशील गं
तरी सलतंय माझ्याही मनात...!
बोलू शकत नाही आता मी
पाहून घे माझ्या डोळ्यात...!
माझा छंद नाही दुःखात राहण्याचा
तूही ठेऊ नको भलतेसलते तुझ्या मनात...!

