बकुळ
बकुळ
1 min
417
माझ्या अंगणातल्या बकुळीचा सडा
रोज ओल्या मातीवर पडायचा.....
किती जाई जुई त्याच्या शेजारी होत्या
पण तो मनावर वेगळीच भुरळ घालायचा...
कोवळ्या उन्हात रोज त्या बकुळीला पाहणे मला आवडायचे....
तिचा सडा मी अलगद ओंजळीत घ्यायचे....
एके दिवशी येता झंझावात सड्यासवे ते बकुळीचे झाडही मातीवर कोसळले...
आता त्याचा काय उपयोग म्हणून त्याला सगळ्यांनी दूर सारले....
जाई-जुईची वेल रोज बहरत होती...
पण बकुळीच्या सड्याची ओढ अजुनही कायम होती....
अश्याच एका सोनसकाळी एक पालवी मला अंगणात दिसली....
बरसेन मी बकुळ होऊन पुन्हा असे मला म्हटली...
