द्विधा मन
द्विधा मन
आठवतात ते जुने दिवस
प्रेम सातवी आठवीतले
नजरानजर होताच मग
अंगावर शहारे आलेले.....
कळले नाही काही
भावनात कधी गुंतलो
ह्रदयाच्या कुपीतून
एकमेकात मनात घुसलो....
जमाना तो होता हो
प्रेमाच्या चिठ्ठी चपाटीचा
चुकवून सार्यांच्या नजरा
खेळ लपत छपत अंतराचा...
व्यक्त होता येत नव्हते
कुणाला बोलता येत नव्हते
मनातल सांगण तर दूरच
मग भाष्यच करता येत नव्हते...
आवडलेली व्यक्ती मग काय
लपून छपूनच पाहायची
ह्रदयाचा ठोका चुकताच
हळूच नजरेतून संधी साधायची...
समजले घरी आई वडीलांना
मोठे होताच लग्न लावले
ताटातूट दोन जीवांची झाली
आपापले संसार सुरू जाहले.....
खूप वर्षांनी गतकाल आठवला
फेसबूकवर नव्याने ओळख झाली
जूनीच ही ओळख पण खूप हर्ष झाला
दोन प्रेमी मिलनाला परत संधी मिळाली...
आज दोघेही आहेत
खूप खूप आनंदात
प्रेम भरती आली जीवनी
जबाबदारीने वागून संसारात....
नाही अवस्था आता द्विधा मनाची
संसार छानचालू आहे आता
प्रेम पण जपलेय अंतरात हो
मारीत नाही हो फक्त बाता.....

