दुष्काळाच्या कविता
दुष्काळाच्या कविता
1
बेजार झालो निराश झालो
दुष्काळाने अडली दुनिया
जीवनाचे वाजले तीन तेरा
डोळ्यात दाटतो सूर्य गड्या
सूर्य ओकतो आगीची
पोटामध्ये कुरकुर गड्या
थकलो जरी कंटाळलो
जरी उद्या होणार पहाट आहे
फुंकर घाली दुःखावर पुढारी
उपदेश मज बरा वाटला
लाथ मारून पाणी काढन्या
दंडामधला स्नायू पेटला
2
अश्रू गाळून रडतात तसे
पाऊस तुमच्यावर रडला होता
आयुष्य सुखी जगतांना
बुद्ध कुणास कळला होता
3
सूर्याच्या आगीन अंतकरण फोडतो टाहो
ढेकूण मोंगसा घेऊन म्हणे मारबत जावो
हाताला आले वळ
पायाला झाले फोड
बैलाच्या पायाला भेगा
नशीबाचं अडलं घोडं
मातीच्या भिजण्यात
अंकुरले स्वप्नवेल
कपाळाच्या धारानी
शिजतो भाताचे रे मोल
दुष्काळातही अश्या
घामाची बिसलेरी पिणार का हो !
ढेकूण मोंगसा घेऊन म्हणे मारबत जावो
4
पाऊस म्हणजे आसवांची धार होती
ढगामधला राग असा
शेतकऱ्यांची हार होती
शासन आणि पाऊस एकच
यार! तुमची गरज फार होती
5
झिरपतो घाम
त्याला अवकाळ म्हणे
कोसळत्या आसवांना
बाप पावसाळा म्हणे
साली, राबणाऱ्याशीच
फितूर होते दुनिया
बरसलाच नाही
त्याला दुष्काळ म्हणे
