Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sanjay Yerne

Others

3  

Sanjay Yerne

Others

मातीतली प्रेम कविता

मातीतली प्रेम कविता

1 min
133



वेड लागावं म्हणून 

नाही कुणी प्रेम करत

खरेतर वेडं व्हावं लागतं प्रेमात

हा प्रेमाचा सिद्धांतच असतो


म्हणून मी सूर्याच्या आकारागत

विशाल भाकरीवर प्रेम करुन

लाथ मारुन पाणी काढीत

ओतत गेलो शेतात घाम


तेव्हा बैलाच्या हलणा-या मानेची 

सुचकता....

मला समजलीच नाही

मी टोचत गेलो तुतारी

निर्मळ भुकेच्या प्रेमास्तव


सालं किती प्रेम करावं

या शेतीवर नं मातीवर

तो सूर्य मुतला तेव्हा

रडवेला झालेला जीव

कारभारीन बघते ढगाकडे...


वादळ घोंघावते...

प्रेमाची परिभाषा बदलली

हे कसे कळेल मला

घामाच्या रक्तधारा...

ती टिपून घेते पदराने


शेती पिकली नाही तरी चालेल

पाणी नसले तरी चालेल

कोपला निसर्ग तरी चालेल

भाव पडला तरी चालेल

पण धनी जपला पाहिजे

हे तिचं तत्त्वज्ञान ....


स्वहत्या करणारे बघून

तीचं प्रेम असच

मुक्या बैलागत मान हलवून सांगणारं.

तेव्हापासून आम्ही करतो प्रेम

या मातीवर......

तुमची दुनिया बरी आहे हो!

कारण तुमचं प्रेम हे छातीवर...

एवढाच काय तो तुमच्या, आमच्या 

सिद्धांतातील फरक......




2


तिच्याशी रोज बोलायचो

म्हणजे मनातल्या मनात

आणि ती रोज हसायची

फक्त गालातल्या गालात


तीच्या हसण्याची शेती

मनातल्या मनात करणे

दुष्काळात बांधावर 

माठाने पाणी भरणे


बांधावरील राबण्याला 

तीचे मन नाकारते

अंगकोळी होत गाते

नि दहीभात खाते


खाण्यासाठी जगणे

असे नाकारते मला

अरे शेतकऱ्यांच्या मुला

कशी पेटवेन रे चुला !


चुल पेटवण्याची रीत

प्रेमाच्या किती त-हा

असो तुझे हे जाळणे

मी कुवाराच ब-हा



Rate this content
Log in