STORYMIRROR

Pallavi Udhoji

Romance

3  

Pallavi Udhoji

Romance

दुसरे काहीच मागणे नाही

दुसरे काहीच मागणे नाही

1 min
352

काय वाटे मनाला माझ्या

कसं सांगू अन् कुठून सुरुवात करू

कारण मलाच माझं कळत नाही

तरी व्यक्त कोणाजवळ होऊ


प्रेमात पडला जीव माझा 

पण सांगू कसं मी तिला आता

प्रेमात पडलं की असं होतं

हे मला कळतंय नव्याने आज


खरं सांगू मन माझं लागत नाही

तिच्याविना मला करमत नाही

पण एक बाजू ही माझी झाली

तिचं काय मला अजून कळलं नाही


दिसली मला ती पैलतिरी

बघत होती मज दुरुनी

इशारा मज केला तिने

खरं काय होतं मला ते ना कळे


सिग्नल तिच्याकडून मिळाला मला

आनंदाला पारावार नाही राहिला माझ्या

खुशीत होतो मी त्यावेळी

होकार आला मला तिचा

 

देवाजवळ काहीच मागणे नाही

कारण तिच्याशिवाय दुसरे मी काहीच मागत नाही


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance