दुरावा
दुरावा
जवळ असूनही तू
मज दूर का वाटतोस
सोबत असूनही तू
मज दूर का भासतोस
स्वप्नात येऊनही तू
मज का असं छळतोस
प्रेम असूनही तू
असं लांब का जातोस
सोबत असूनही क्षणोक्षणी तू
का असा हरवतोस
माझा असूनही तू
मज परका का वाटतोस

