STORYMIRROR

Yogesh Nikam

Romance

3  

Yogesh Nikam

Romance

दुनियेच्या गर्दीत

दुनियेच्या गर्दीत

1 min
325

सकाळी उठल्यावर डोळे भरुन तुला बघायचं

मी कामाला जाताना टिफीन देवून तू मला बाय करायचं 

न विसरतां सांभाळून जा असं तू म्हणायचं

तरीही दुनियेच्या गर्दीत मी तुलाच शोधायचं..!


ऑफिसला जाताना तु सोबत आहेस असं समजायचं 

तु दुपारी कामातून वेळ काढून जेवलात का विचारायचं

सायंकाळी चहा घेताना मी तुझ्या आठवणीत बुडायचं

तरीही दुनियेच्या गर्दीत मी तुलाच शोधायचं..!!


घरी येताना फोन करुन लवकर या असं तु म्हणायचं

माझ्या येण्याची वाट बघत दारासमोर ये जा करायचं

मी ही तुला भेटण्यास आतुर होऊन घरी परतायचं

तरीही दुनियेच्या गर्दीत मी तुलाच शोधायचं...!!!


घरी येताच तुला बघून दिवसाच्या थकव्याने दुर पळायचं 

तु बनविलेल्या चविष्ट जेवणाने भरपेट जेवायचं

रात्री प्रेमाच्या गप्पात रंगून तुझ्या कुशीत झोपायचं

तरीही दुनियेच्या गर्दीत मी तुलाच शोधायचं...!!!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance