STORYMIRROR

Sarika Jinturkar

Tragedy Others

3  

Sarika Jinturkar

Tragedy Others

दुखवायचे नाही कुणाला

दुखवायचे नाही कुणाला

1 min
8

तसे दुःखाचे नाही कुणाला 

पण खोट्या आशेची आता

 भीती वाटते 

कामासाठी गोड बोलण्याची

 समाजाची ही रीत

 मनाला खटकते 


 जिथे वर्ष-वर्ष विचारत नाही 

 कोणी तिथे कसे आहात?

विचारणे ही खोटी प्रीत वाटते  

नात्यात स्वार्थ नाही

 स्वार्थासाठी नाती जोडल्याची

प्रचिती जेव्हा येते  

तेव्हा भारी चीड उठते 

संपल्यावर गरज जेव्हा 

 नाती आपलीच अनोळखी होतात अशा स्वार्थाची

 ही कीव वाटते  


आयुष्यभर आपुलकी, प्रेम

 जिव्हाळ्याची सोबत जेव्हा 

मिळते तेव्हाच खरी प्रीत वाटते 

फळाची अपेक्षा नसते मात्र 

तिथे खरे समाधान लाभते 

तसे दुःखाचे नाही कोणाला 

पण खोट्या आशेची आता 

भीती वाटते...



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy