STORYMIRROR

shubham gawade Jadhav

Romance

3  

shubham gawade Jadhav

Romance

दुःखद प्रेमाची कहाणी

दुःखद प्रेमाची कहाणी

1 min
189

का? वाटलं मनाला

की बोलाव तुझ्याशी

विचार नव्हता केला

की नातं जुळल माझ्याशी

कधी ? कोणास ठाऊक

आवडून गेली मनाला

वाटलं की मनातलं

विचारून टाकावं तुला

बस तोही दिवस उजाडला

डांबुन ठेवलेल्या भावना मोकळ्या केल्या

पण त्या भावना सुखाऐवजी

सततचा डोळ्यांना ओलावा देऊन गेल्या

माझ्या त्या निखळ प्रेमाला

तिनं वासनेच गालबोट लावलं

हवंहवंसं वाटणार प्रेम मला

15 मिनिटातच संपून गेलं

भळभळती जखम ती

माझ्या मनात घर करून गेली

जाता जाता मात्र या हृदयाचे

हजारो तुकडे करून गेली

वेचताना ते तुकडे

माझे हृदय खूप खूप रडलं

वाटलं हे हवं असणार लोभस

लालची प्रेम उगाच घडलं

का ? नव्हता केला तिनं

माझ्या मनाचा थोडासाही विचार

एकदाही नसेल का वाटलं तिला

की मला याचं दुःख होईल फार


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance