दुःख
दुःख
सुखामागून येई दुःख
दुःखामागून येई सुख
गरिबांची वीतभर पोटाची
सांगा कोण भागविल भूक....!!
नको सुखात हुरळू
नको दुःखाचा डांगोरा
येईल त्याला खुशाल
बिनधास्तपणे जा सामोरा...!!
सुख आणि दुःख आहेत
एकाच नाण्याच्या बाजू दोन
उनसावलीप्रमाणे येती फिरुनी
सांगा त्याला अडवील कोण?
येवो कशीही परिस्थिती
हिंमत तू कधी हारू नको
सुखानंतर मलाच दुःख
म्हणून चिंता करीत बसू नको....!!
दुःखानंतर येते सदा
सुख आणि सुखच फक्त
आल्या परिस्थितीशी दोन हात
करायला होऊ नको तू सक्त....!!
