STORYMIRROR

Ravikant Shardul

Inspirational

3  

Ravikant Shardul

Inspirational

दुःख बापाचे

दुःख बापाचे

1 min
26.8K


सरणा वरती बाळा तुला ठेविले

जाता जाता भाव मनीचे उमटले

करतला फोडा सम तुला जपले

जाता जाता हे सारे मज उमगले

 

प्रथम सुत घराण्याचा तू निपजला

घरी दारी आनंदी आनंद जाहला

बहु हर्षाने जन्म तुझा गाजविला

जाता जाता बाळा कंठ माझा दाटला

 

कसा काळाने लेकरा घाला घातला

तुला आमच्यातून हिरावून नेला

दुनियादारीने बाप तुझा थकला

जाता जाता नयनाचा बांध फुटला

 

उमज ना समज आजाराची मला

किडनी आजार कसा तुज लाभला

केले नाना उपाय हाती ना लागला

जाता जाता जीव कासावीस झाला

 

सरसावले उदार जन मदतीला

लाखोने जमली राशी उपचाराला

आई धावून आली दाता किडनीला

जाता जाता दवाखाना तो आठवला

 

करूनी रे रोपण किडनीचे तुजला

अल्प काळ आम्हा सवे तू राहिला

आठव तुझा रे गहिवरूनी आला

जाता जाता भावंडांनी विलाप केला

 

कसे सावरावे तुझ्या रे माऊलीला

अन् माझ्याही किडनीदाता आईला

घास तोंडाचा हिसकावून घेतला

जाता जाता भरभरून तू बोलला

 

ऋणी आहे रे मी सर्व दानशूराला

ज्यांनी ज्यांनी भार माझा सोसला

दुःख बापाचे कसे सांगावे जगाला

जाता जाता बरे सुटला या त्रासाला

 

विनवितो रविकांत मित्रो तुम्हाला

जपा आपल्या शरीरातील शृखंला

नको अतिरेक या मानवी देहाला

जाता जाता अर्थ तो लाभो जीवनाला

 

 

रविकांत शार्दूल नाशिक


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational