STORYMIRROR

Ravikant Shardul

Others

2  

Ravikant Shardul

Others

ओंजळ

ओंजळ

1 min
3.4K


ओंजळ माझी फुलांची रिती कशी जाहली

स्पर्शात गंध होता, रात्र ती उदासीन गेली

 

भावनेच्या भरात  कसा साहिला वनवास

हृदयात ओल होती तुटला तरी सहवास

 

मी जाणिले थोतांड दुनियेत शेरदिलांच्या

फाटला खिसा माझा मी मैफिलीत त्यांच्या

 

वाटते आज मलाही, ओंजळ पुन्हा भरावी

बंध ते माणुसकीचे, अंतरी पुन्हा साठवावी

 

थोरांच्या संगतीत अनुभवी आयुष्य सरले

चाहुल लागता भीकेची, कुणी मागे न उरले

 

मी जन्मलो नाही नुसताच जगण्यासाठी...

नाते मना मनातील, ओंजळ भरण्यासाठी...

 

रविकांत शार्दूल नाशिक 


Rate this content
Log in