दंगल
दंगल
एकमेकांच्या स्वार्थाची
खऱ्या अर्थाने दंगल पेटली
माणुसकीचा विश्वात
जातीची दंगल उठली
माणूस माणसात राहिला नाही
अमानुष दंगलीमुळे
दंगलीची हौस जिरेना
हेच कळेना मले
मस्तकात पुस्तके
घालण्याची वेळ आली
बगता बगता लोक हो
दंगल पेटली
कोणी काठ्या,तर दगडे वेचित होते
हल्ल्यात त्या माणूस पेटत होता
दंगल एक माणसे अनेक
पण कोणीच दंगलीची ग्वाही देत नव्हता..
दंगलीचे घरे उध्वस्त होत होती
कुंपणच शेत खात होती
शिल्लक काहीच नव्हते
माणसं जमली होती दंगली भोवती
