STORYMIRROR

Mangesh Medhi

Inspirational

4  

Mangesh Medhi

Inspirational

दंगा मस्ती

दंगा मस्ती

1 min
498

दंगा मस्ती करु चला धुमधडाका करु चला

अरे दंगा मस्ती करु चला आईला त्रास देऊ चला


सगळ्या वस्तू पाडू चला इकडचे तिकडे करु चला

खेळणी सगळी मांडूया नाहीतर सरळ मोडूया

होऊ देत सगळा पसाराच पसारा


अरे दंगा मस्ती........


उचका पाचक करुया बाबांचा फ़ोन ओढूया 

इकडून तिकडे पळूया अजोबांना जरा दमवूया

उडूदेत नुसता धंगाणाच धिंगाणा


अरे दंगा मस्ती........


काकाशी मस्ती करुया आरडा ओरडा करुया

आरोळ्या किंकाळ्या एकच कल्ला खुप खुप मज्जा येई घरा

होऊ देत कसा गोंगाटच गोंगाट


अरे दंगा मस्ती........


अजोबांचा चष्मा पळवूया घर डोक्यावर घेवूया

कंटाळा उडवून लावूया मस्त नाचू गाऊया

करुयात नुसती मज्जाच मज्जा


दंगा मस्ती करु चला धुमधडाका करु चला

अरे दंगा मस्ती करु चला आईला त्रस देऊ चला


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational