STORYMIRROR

Shila Ambhure

Romance

3.0  

Shila Ambhure

Romance

दिवस प्रेमाचा

दिवस प्रेमाचा

1 min
1.7K




दिवस प्रेमाचा

नसे ठाऊक आम्हा

फॅड तुम्हा

'डे' चे


होता जरी

काळ आमचा मागास

नव्हता सायास

प्रेमासाठी


पति -पत्नी

असे प्रेम पहिले

सर्वस्व वाहिले

त्यासाठी


सरले दिस

लोटली वर्षे अनेक

नजर एक

पुरेसी


झाली सायंकाळ

आमच्या जीवनाची जरी

प्रीत खरी

साथीला.


प्रेमाने भरवितो

सुखाचा घास एकमेका

खोट्या आणाभाका

नाहीत.


दिवस प्रेमाचा

करितो रोज साजरा

माळूनि गजरा

केसांत.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance