दिवस पहिला शाळेचा
दिवस पहिला शाळेचा
दिवस पहिला आज शाळेचा
मज आनंद झाला लई ,
घंटी वाजली शाळेची
मज झालिया शाळेची घाई....
शाळा सुरू आजपासून
मन गेलंय लई आनंदून,
गुरुजी, मित्राच्या भेटीला मन
आतूर झाले हे लई....
करुन लवकर स्नान
हे नवे कपडे घालून,
दप्तर पाटीवर घेऊन
असा दौडत शाळेत जाई...
ओढ लागली या शाळेची
गोडी हवी शिक्षणाची,
मिळे अनमोल शिक्षण, संस्कार
सारं अज्ञान दूर होई...
चल रे मित्रा शाळेला जावू
नको घरी आज तू राहू,
सारे श
िकून शहाणे होऊ
खुश होतील बाबा नी आई...
डॉक्टर, इंजिनिअर, कलेक्टर
माणूस होतोय मोठा फार,
गेली दुनिया चंद्रावर
हे सांगायची गरज नाही...
मला आवडते माझी शाळा
ज्ञान आहे हा तिसरा डोळा,
धावत,पळत, जावूया शाळेत
घरी मज करमत नाही...
दूध वाघिणीचे शिक्षण
शिक्षण प्रगतीचे लक्षण,
सारे करु ते प्राशन
उध्दार जीवनाचा होई...
शाळा म्हणजे गावची शान
हवा गावाला अभिमान,
कपडे, पुस्तक, भोजन
ही सरकारची पुण्याई..