दिवाळी
दिवाळी
सण चार दिवसाचा
दिवाळीच्या आनंदाचा
मात्र तयारी जोराची
लागे वेळ महिन्याचा.....१
साफ सफाई घराची
गडबड फराळांची
अनरसे लाडू शेव
चढाओढ पदार्थाची......२
धुम धडाके फटाके
रंग बिरंगी रांगोळ्या
रोषणाई पणत्यांची
भल्या पहाटे आंघोळ्या......३
नव्या वस्तुची खरेदी
ओवाळणी दिवाळीची
लक्ष्मी पुजन वह्याचे
नुतनाच्या आरंभीचे.......४
नाते अतुट जन्माचे
भाऊबीज भाऊराया
करी औक्षण भाऊचे
बहिणीची वेडी माया.......५
सण दिवाळी सौख्याचा
नाते बंध जोडण्याचा
भेट वस्तू एकमेका
देणे घेणे करण्याचा.......६
रात्र जरी अमावस्या
लख्ख प्रकाश दिव्याचा
क्षण आनंदी सर्वांचा
नव्या उमेदी वर्षाच्या........७
