दिवा
दिवा
मधून साजणा उगीच काय, लावतो दिवा
मधाळल्या प्रितीस आपल्याच, पाहतो दिवा
स्व ओंजळीत पाकळीत श्वास, गुंफले जसे !
गुतेन रातही जरी असेन, बंद तो दिवा!
शशीस चांदणी कधी उनाड, त्यास चुंबते?
उरातल्या प्रकाश चांदण्यात, नांदतो दिवा
उसासल्या दिव्यास भोवताल, भेटली निशा
अधीर तो पतंग पेटला नि, त्रासतो दिवा
मिटून पापण्या सख्या चुरून, टाक तू फुलं
कळीतले तरंग पाहताच, हासतो दिवा

