दिवा आशेचा
दिवा आशेचा
दिवा सारतो तिमीर
अंधःकार रुपी दुःख
जाते सदाची पळूनी
तेजाळतो देण्या सुख
तेज, प्रकाश ,उजेड
दावी किरणे आशेची
प्रकाशता तेजाने ती
दूर करी निराशेची
एक दीप लावताच
आसमंत उजळून
किंतु , परंतु चे जाळे
मनातून ते जाळून
भाव सकारात्मक ते
मनी यशाची चाहुल
मग खचित वळते
प्रयत्नाचे ते पाऊल
दिवा तेजाळता पहा
मनी मोद क्षणभर
भाव ते सकारात्मक
दिवा होतो दिवाकर
