दिसतेय तुझ्या डोळ्यात....
दिसतेय तुझ्या डोळ्यात....
दिसतेय तुझ्या डोळ्यात मला
तुझं माझ्यावरचं खरं प्रेम ।
का लपवतेस मग जरी तू मला
स्मरत राहतेस नित्य नेम? ।।
का नाकारतेस प्रेमाला
तडपवतेस तू माझ्या मनाला ।
छळतील तुला म्हणून का गं
भितेस या दुनियेला ।।
दडवू नको तुझ्या आतल्या आवाजाला
सांगून टाक जे आहे मनात ।
प्रेमलहरी उसळतेय सखे
पाहून तुला गं सर्वांगात ।।
प्रेम तुझ्यावर मी पण करतो
सांगतोय मी गं तुला ।
होकार देऊन माझ्या प्रेमाला
वरून घे तू मला ।।

