दिशा
दिशा
पीडीतेची पाहून दशा
रडल्या असतील दिशा
कल्पना नको करावया
कशी झगडली ' दिशा '
अधम रक्तात काळ्या
वासनेची बेधुंद नशा
पापकर्म कभीन्न काळे
काळवंडून जाय निशा
उगवताना पहिल्यांदा
रडवेली जाहली उषा
पिपासीत वासनांध ते
ही कशी राक्षसी तृषा
असूरांचे ते एन्काऊंटर
क्षणात पाडला फडशा
परमात्मा न्याय करीतो
पल्लवीत नव्या आशा
