STORYMIRROR

Hemant Musrif

Others

4  

Hemant Musrif

Others

पत्रकार

पत्रकार

1 min
585

पत्रकार दुधारी तलवार

करी मनावर थेट वार

अचूक भिडे काळजाला

लीलया पोचतो आरपार


सरस्वतीचा तो अवतार

साहित्याचा स्वर गांधार

नवरसांचा अमृत कलश

नटराजाचा साक्षात्कार


दीनदुबळ्याचा तारणहार

वेदना पुसतो तो हळूवार

आवाज मुक्याचा बनतो

शोषीतांचा तोचि आधार


जोडतो पाडतो सरकार

ठेवत नाही काही उधार

दहशत भिती कुठे त्या

जीवा वर सदैव उदार


नव युगाचा तो हुंकार

प्रगती उन्नती आविष्कार

स्वप्न उद्याचं उमलणारं

मोहक सुगंधी सुमनहार


लाखात एक चमत्कार

जणूं उत्सव दिपत्कार

समाजाला द्याया आकार

जन्मावा लागतो पत्रकार


Rate this content
Log in