STORYMIRROR

Hemant Musrif

Others

3  

Hemant Musrif

Others

व्हॅलेन्टाईन

व्हॅलेन्टाईन

1 min
138

व्हॅलेंटाईन डे सरला

स्नेह जपावे शाश्वत

प्रेमाची ज्योत मनात

सदैव राहो उजळत


गुलाब जरी निर्माल्य

सुगंध राही दरवळत

जीवन इतके सुंदर

का राहावे कळवळत


जपावे जरा स्वतःला

चुका न हो नकळत

मुश्किलीने कधीतरी

सूर असतात जुळत


Rate this content
Log in