STORYMIRROR

Hemant Musrif

Romance

3  

Hemant Musrif

Romance

प्रेम

प्रेम

1 min
178

प्रेम दिसे सख्या तव

चहा देता वाफाळून

व्हॅलेंटाईन डे नको

रोजच येते उफाळून


आॅफीसला जाताना

पाहता हळूच वळून

बोलला नाहीत तरी

तुझे प्रेम येते कळून


आठवणीने आणला

गजरा घेता माळून

प्रेम सुवास दरवळे

तू पाही जेव्हा वळून


बाहुपाशात तुझ्या

सुस्वर सुरेल जुळून

विरहात जाणवे प्रेम

पडता मी उन्मळून


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance