दीपावली
दीपावली
रंग,तेज अन् उत्साहाचा दीपावली सण,
चार दिसांची आनंदाची अविरत उधळण!
रांगोळीच्या शतरंगांनी निखरून गेला सारा परिसर,
लक्ष दिव्यांच्या प्रकाशिकांची नभात पाखर!
फराळ रूचकर, सगे-सोयरे येती भेटी,
धणे पेरल्या किल्ल्यावरती शिवशाहीची दाटीवाटी!
सुखी,समृध्द,आनंदी होवो विश्व-सकल जन.
अंतरीची ज्योत जागू दे उजळून जीवन!
