Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Vimal Patkari

Tragedy

3  

Vimal Patkari

Tragedy

दीप तू होशील का ?

दीप तू होशील का ?

1 min
218



थीजलेल्या नयनांनी

पहातोय वाट तुझी

कधी रे तू येशी सांग ना

घरी आपुल्या बाळा राजसा

ये रे ,ये रे ,ये रे तू !!


मातृत्वाचा वसा जन्म देवून पुरा केला

तळहातांचा पाळणा केला नेत्रांचा दिवा

अंधारल्या वाटेच्या या आमुच्या 

बाळा तू रे दीप होशील ना ? !!


दमुनी,थकुनी जेव्हा तुझा बाबा येई घरा

पाहुनी तुझ्या लीलया घालवी थकवा सारा

थकवा त्याचा रे दूर सारण्या 

बाळा थोडा वेळ देशील ना ? !!


मऊ-मऊ भात तुझ्या आवडीचा करुनी रे खास

चिऊ अन काऊचे तुला भरविले रे घास

शमवण्या तुझ्या भेटीची आस

बाळा भेटण्या येशील ना ? !!


बोट धरुन तुला शिकविले चालण्याला

बोल तुझे ऐकण्याला शब्दांचा सराव दिला

हितगुज आमच्याशी रे करण्या

बाळा सोबतिला येशील ना ? !!


आवड-निवड तुझी सारी आम्हा ठावूक बाळा

कपडे,खाऊ,खेळण्यांचा पुरविला हट्ट सारा

म्हातारपणिचा रे हट्ट आमचा

बाळा पुरवण्या येशील ना ? !!


जगावेगळेसे आम्ही बाळा काही नाही केले

हर एक माय-बापाचे कर्तव्य रे निभावले

थकल्या,भागल्या या तन -मना 

बाळा तुझा आधार देशील ना ? !!


जिथं ही असशी बाळा तिथं तू सुखी रहा

आनंदी संसारनौका जोडीनं रे वल्हवा 

दुधावरल्या साइलाही आमुच्या

माया-ममतेने रे जपा !!!



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy